भुसावळ येथे जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कॅमेरा पूजन.

 भुसावळ (प्रतिनिधी)  जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात बुधवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी  भुसावळ वृत्तपत्र छायाचित्रकारांनी  कॅमेरा पूजन करून जागतिक छायाचित्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेम परदेशी  उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छायाचित्रकार श्याम गोविंदा कमलेश चौधरी, विनोद गोरधे यांचे हस्ते विधिवत कॅमेरा पूजन करण्यात आले.  प्रसंगी उज्वला बागुल व उपस्थितांनी छायाचित्रण क्षेत्रातील योगदान, वृत्तपत्रीय छायाचित्रकारांची जबाबदारी तसेच समाजातील महत्त्वपूर्ण घटनांचे छायाचित्रांद्वारे दस्तऐवजीकरण करण्याच्या भूमिकेबाबत मनोगत व्यक्त केले.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी सांगितले की पत्रकार हा आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक घडामोडींचे विश्लेषण करून ते समाजा समोर मांडत असतो. मात्र छायाचित्रकार त्यांच्या  कॅमेऱ्याच्या एका क्लिक वर छायाचित्र काढून ते समाजासमोर सादरीकरण करत असतात. एक क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांना अतिशय कसरत करावी लागते. त्यांच्या एका  फोटोने  बातमीचे महत्त्व लक्षात येते.
     याप्रसंगी पत्रकार सुनील आराक, उज्वला बागुल, आकाश ढाके  मनोहर लोणे  यांचेसह छायाचित्रकार श्याम गोविंदा, कमलेश चौधरी, विनोद गोरधे, किशोर साळवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल आराक यांनी केले. तर आभार संतोष शेलोडे यांनी मानले.