भुसावळ - रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खालील एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच (AC 2-Tier) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. * गाडी क्र. 22685/22686 यशवंतपूर–चंदीगड–यशवंतपूर एक्सप्रेस गाडी क्र. 22685 यशवंतपूर येथून दिनांक 05.09.2026 ते 03.10.2026 पर्यंत गाडी क्र. 22686 चंदीगड येथून दिनांक 08.09.2026 ते 06.10.2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे. * गाडी क्र. 12629/12630 यशवंतपूर–हजरत निजामुद्दीन–यशवंतपूर एक्सप्रेस गाडी क्र. 12629 यशवंतपूर येथून दिनांक 18.08.2026 ते 01.10.2026 पर्यंत गाडी क्र. 12630 हजरत निजामुद्दीन येथून दिनांक 19.08.2026 ते 02.10.2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे. * गाडी क्र. 22687/22688 म्हैसूर–वाराणसी–म्हैसूर एक्सप्रेस गाडी क्र. 22687 म्हैसूर येथून दिनांक 03.09.2026 ते 01.10.2026 पर्यंत गाडी क्र. 22688 वाराणसी येथून दिनांक 05.09.2026 ते 03.10.2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे. * गाडी क्र. 17323/17324 हुबळी–बनारस–हुबळी एक्सप्रेस गाडी क्र. 17323 हुबळी येथून दिनांक 11.09.2026 ते 02.10.2026 पर्यंत, गाडी क्र. 17324 बनारस येथून दिनांक 13.09.2026 ते 04.10.2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे. प्रवाशांनी या अतिरिक्त सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे आणि ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासावी.


