बडनेरा–नाशिक रोड मेमू विशेष रेल्वे सेवेचे नियमित सेवेत रूपांतर

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या मेमू विशेष रेल्वेचे नियमित रेल्वे सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन गाडी क्रमांकासह नियमित रेल्वे सेवा म्हणून चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधाजनक, विश्वासार्ह आणि नियमित रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या धावणाऱ्या गाडी क्रमांक 01211/01212 बडनेरा–नाशिक रोड मेमू विशेष सेवेचे खालीलप्रमाणे नियमित सेवेत रूपांतर करण्यात येणार आहे.

* गाडी क्रमांक 61130 बडनेरा–नाशिक रोड मेमू दिनांक 15.08.2026 पासून दररोज बडनेरा येथून धावेल.
* गाडी क्रमांक 61129 नाशिक रोड–बडनेरा मेमू दिनांक 15.08.2026 पासून दररोज नाशिक रोड येथून धावेल.

नियमित रेल्वे सेवेचे वेळापत्रक - 
* गाडी क्रमांक 61130 बडनेरा–नाशिक रोड मेमू दिनांक 15.08.2026 पासून दररोज बडनेरा येथून 10:05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नाशिक रोड येथे 19:40 वाजता पोहोचेल.
* गाडी क्रमांक 61129 नाशिक रोड–बडनेरा मेमू दिनांक 15.08.2026 पासून दररोज नाशिक रोड येथून 21:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बडनेरा येथे 05:35 वाजता पोहोचेल.

थांबे - मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि निफाड. 

संरचना - 12 मेमू कार

प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप डाउनलोड करता येईल. या नियमित रेल्वे सेवेचे थांबे आणि वेळांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.