भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्याकडे

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांची नुकतीच भुसावळ शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर, एरंडोल येथून बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला होता.

दरम्यान, दि. १० ऑगस्ट रोजी जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रोबेशनरी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत दरेकर यांची तीन महिन्यांसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कामकाजाची जबाबदारी प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर सुनसगाव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी शाल व पुस्तके देऊन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांचा सत्कार केला.

यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे रीडर एएसआय संजय तायडे, पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक आदी उपस्थित होते..