शालीमार-गुवाहाटीसाठी विशेष पार्सल रेल्‍वे गाड्‍या धावणार!


भुसावळ-मध्‍य रेल्‍वेतुन शालीमार व गुवाहाटीसाठी विशेष पार्सल रेल्‍वे गाड्‍या धावणार आहे.
कोरोनाच्या दुष्प्रभाव व लॉक डाऊन मुळे अत्‍यावश्यक साहित्‍याची वाहतूक करण्यासाठी पोरबंदर – शालीमार विशेष पार्सल गाड़ी क्रमांक ००९१३ डाऊन ही गाडी दि.१३,१५,१७,१९,२१,२३,२५,२७ व २९ जुनला पोरबंदर येथून सकाळी ८ वाजता सुटून तीन दिवसांनी मध्‍यरात्री १-३० वाजता शालीमार येथे पोहचेल .
गाड़ी क्रमांक ००९१४ अप शालीमार – पोरबंदर विशेष पार्सल गाड़ी ही दि.१५,१७,१९,२१,२३,२५,२७ व २९ जुन आणि १ जुलै रोजी शालीमार येथून १०-५० वाजता सुटून तीन दिवसांनी ६-२५ वाजता पोरबंदर येथे पोहचेल . तर भुसावळ ते न्यू गुवाहाटी विशेष पार्सल गाड़ी चालविण्‍यात येणार आहे .
भुसावळ ते न्यू गुवाहाटी विशेष पार्सल गाड़ी क्रमांक ००१३९ एकच फेरी दि.१४ जुन रोजी भुसावळहुन १० वाजता निघून दि.१६ जुन रोजी गुवाहाटी येथे ९ वाजता पोहचेल .
गाड़ी क्रमांक ००१४० अप न्यू गुवाहाटी – भुसावळ विशेष पार्सल गाड़ी ही दि. १६ जुन रोजी गुवाहाटीहुन ११-३० वाजता प्रस्थान करुन दि.१८ जुनला ११-२० वाजता भुसावळला पोहचेल .
या गाडीला नागपुर,दुर्ग , बिलासपुर,झारसुगुडा,टाटानगर , मालदा टाउन,न्यू जलपाईगुडी , न्यू बोगाईगाव या स्‍थानकांवर थांबा राहणार आहे.ज्या लोकाना काही साहीत्‍य पाठवयाचे असेल त्यांनी आपल्या जवळ पासच्या स्थानकावर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा मागणी नुसार गाड़ी ची फेरी वाढविण्यात येणार आहे असे भुसावळ रेल्‍वे वाणिज्‍य विभागाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *