डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला ;


जळगाव( प्रतिनिधी )-
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या समोर सरकारी आरोग्य यंत्रणेला कार्यक्षम करण्याचे मोठे आव्हान ठरणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीमुळे  हाहाकार उडाला असून याचा प्रतिकार करण्यात प्रशासन संपूर्ण  अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. यातच जिल्हा शासकीय रुग्णालयामधील शौचालयात एका महिलेचा मृतदेह तब्बल आठ दिवस पडून असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती.  या घटनेमुळे जनमानस संतप्त निर्माण झाल्यावर या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्यासह पाच अधिकारी व तीन कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. तर याच प्रकरणात सदोष मनुष्यबधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, डॉ. भास्करराव खैरे यांच्या जागेवर डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. काल  त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भोंगळपणामुळे बदनाम झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार पारदर्शक आणि सक्षम करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीमुळे  हाहाकार उडाला असून याचा प्रतिकार करण्यात आरोग्य प्रशासन संपूर्ण  यशस्वी करण्यासाठी काय ठोस निर्णय घेऊन जिल्ह्यातून कोरोनाचा समूळ नायनाट कसा करतील या कडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. 
जिल्ह्यातील परिस्थिती बघता कोरोना महामारीसाठी शासनाने दिलेल्या नियमाचे जनतेनी पालन करावे आणि लवकरच आरोग्य यंत्रणा कार्यक्षम बनविन्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ भास्करराव खैरे ययावेळी म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *