भुसावळ (प्रतिनिधी )-
युवासेनाप्रमुख तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ युवासेना तालुका व शहर तर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांची रोगप्रतिकार शक्ति वाढावी याकरीता सुमारे १ लाख ५० हजार होमिओपँथी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप
.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुक्यात व शहरात युवासेना तालुका व शहर तर्फे वाटप करण्यात आले.
तालुक्यात व शहरात कोविड 19 या आजाराने थैमान घातले असुन शहराची व तालुक्यातील जनतेची काळजी घेत युवासेनेने भुसाळ शहरात व तालुक्यात ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेत युवासेना जनेतेच्या पाठिशी खंबियरपणे उभी असून मास्क , सनीटायझर वाटप , रक्तदान शिबिर, यासह अर्सेनिक ३० गोळ्या वाटप केल्या आहेत .
भाविसेना उपजिल्हाप्रमुख दीपक धांडे व निर्मल दायमा यांच्या मार्गदर्शन तसेच जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्या मदतीने युवासेना तालुकाप्रमुख हेमंत ब-हाटे शहरप्रमुख सुरज पाटील यांनी या उपक्रमाचे
आयोजन केले .
यशस्वीतेसाठी शिवसेना शहरप्रमुख बबलु ब-हाटे वरणगांव शहरप्रमुख रवि सुतार, चेतन नाईक ,गिरीश जंजालकर, युवासेना उपतालुकाप्रमुख पवन बाक्से, बबलु धनगर ,कंडारी येथील सुरेंद्र सोनवणे , यांचेसह युवासेनेच्या शिवसैनिकांनी परिश्रम घेतले .
युवासेना घेणार जनतेच्या आरोंग्याची जबाबदारी युवासेना नेहमी कोणत्याही अडचणीच्या वेळी सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहील व भुसावळ तालुक्यातील आरोग्यकेंद्रा मार्फत जनतेची आरोंग्याची काळजी युवासेना घेईल असे युवासेना तालुकाप्रमुख हेमंत ब-हाटे यांनी सांगीतले



