भुसावळ (प्रतिनिधी )-
मॉडर्न रोड वरील गणेश नॉव्हेल्टी अँड मेन्सवेअर , इंदोर चाट भांडार डेली मार्केट या दुकान मालकांनी उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाचे उल्लघन केल्याने रविवार ७ रोजी दुपारी दुकाने सील करण्यात आले .
कोरोनाचा वाढता फैलाव व बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी व्यावसायीकांना दुकाने उघडून द्यावयाचे दिवस ठरवून दिले आहेत शिवाय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे मात्र त्यानंतरही ठरवून दिलेल्या दिवशी दुकान न उघडता नियम मोडल्याने शहरातील दुकानांना सील ठोकण्याची कारवाई रविवार रोजी प्रभारी मुख्याधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पालिकेच्या पथकाने केली .
मॉडर्न रोड वरील गणेश नॉव्हेल्टी अँड मेन्सवेअर , इंदोर चाट भांडार डेली मार्केट या दुकान मालकांनी उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाचे उल्लघन केल्याने दुकाने सील केले आहेत. उप जिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांचे मार्गदर्शन खाली नगरपरिषद पथकातील अधिकारी पंकज पन्हाळे, संजय बनाईते,सुरज नारखेडे, विशाल पाटील,चेतन पाटील, लिपीक राजेश पाटील,विजय राजपूत पो.कॉ दिपक शिंदे यांनी कारवाई केली आहे . व्यावसायिकांनी नियमांचे पालन करा, पुढील आदेश येईपर्यंत आता व्यावसायीकांना दुकान उघडता येणार नाही शिवाय नियम मोडल्यास आणखी कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा सुत्राणी दिला आहे.



