भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरासह ग्रामीण भागात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या होमीयोपॅथी गोळ्यांचे भुसावळ शहर व ग्रामीणमधील जनतेसह,पत्रकारांना, भुसावळातील कोरोना योध्या पोलिस, सफाई कामगार , तसेच सर्व जनतेला रोग प्रतिकारशक्ती वाढण्याकरीता अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले .
माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसह साफसफाई कर्मचारी, वीज वितरण कंपनीत काम करणारे कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्ग, भुसावळ तालुक्यातील सर्व शेतकर्यांना तसेच किरकोळ भाजीपाला विक्रेता तसेच व्यापारी यांना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कृउबा सभापती सचिन चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.तसेच
कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वसामान्य जनतेपर्यंत बातमी पोहोचवण्याचे काम करणार्या भुसावळातील पत्रकारांना देखील या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कृउबा सभापती सचिन चौधरी यांनी विविध वृत्तपत्र कार्यालयात जावून या गोळ्या वाटप केल्या.
एक्स्ट्रा पोलिस फोर्स
एक पाऊल कर्तव्याचा आज माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन संतोष चौधरी यांच्या तर्फे भुसावळ मध्ये बंदोबस्त कामी आलेल्या पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसह आरसीपी प्लाटून पथकाच्या कर्मचाऱ्यांना मोफत अर्सनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.



