नालासफाई कामास मिळाला अखेर मुहूर्त.

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथे पावसाळ्‍यापुर्वी अवकाळी पावसाने दि.३ जुन रोजी दमदार हजेरी लावली होती.
भुसावळ नगरपरिषदेला दरवर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत नालेसफाईला मुहूर्त मिळत नाही मात्र यावर्षी मार्च महिन्‍यापासुन कोरोना मागे लागला आहे.यामुळे खडकारोड भागातील नाला पुर्ण भरून रस्‍त्‍यावरून वाहू लागल्‍याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
अखेर भुसावळ नगरपरिषदेत मा. उपनराध्‍यक्ष हाजी शफी पहेलवान यांनी पाठपुरावा केल्‍याने जेसीबीव्‍दारे नालेसफाईला सुरूवात झाली आहे.यावेळी हाजी शफी पहेलवान,मा.नगरसेवक संतोष बारसे आदी उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *