भुसावळ (प्रतिनिधी )- येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.५ जुन रोजी जिल्हाधिकारी,जळगाव यांचे आदेशाने लावण्यात आलेल्या लाल बिल्डींग कंटेनमेंट झोन येथे नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी तसेच मंडप व बॅरीकेटींग कंत्राटदार हे शासकीय आदेशाप्रमाणे बॅरीकेटींग लावण्याचे काम करीत असतांना रात्री ८ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा आणुन जमावबंदीचे उल्लंघन केले होते.
उस्मानिया कॉलनी,पटेल कॉलनी व अन्सारउल्ला नगर भागातील आसिफखान हबीबखान,एहसान डॉक्टर,नदीम बागवान,मुस्तकीम बागवान,बाबा टिचर,लक्ष्मी बेकरीवाला,रिजवान पीओपीवाला,जाकीर बागवान, मंडपवाला,मुझम्मील आसीफ, रिजवान खान नासिरखान, तौसिफ बागवान, गुड्डू बागवान, सोहेल (सलीम चुडीवाल्याचे बाजूवाला), इद्रीस बागवान सर्व रा.भुसावळ व त्यांचेसोबत उस्मानीया कॉलनी, पटेल कॉलनी व अन्सारउल्ला नगर भागातील ६० ते ७० लोकांचा जमाव अचानक त्याठिकाणी येवून यहा बॅरीकेट मत लगाओ,हमे आने जाने मे तकलीफ होती है असे बोलून तेथे लावण्यात येणारे बॅरीकेट्स उखडून बॅरीकेटचे नुकसान केले तसेच जमावाने एकत्र येवून जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेश सीआरपीसी कलम १४४ खंड (२), (३) व (४) मधील तरतुदींप्रमाणे संचारबंदी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ तसेच जमावबंदीचे उल्लघंन केल्याने त्यांच्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुरनं ५९८/२०२० भादवि कलम १८८/२६९ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) व मुंबई पोलीस अधिनीययम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील एक संशयित आसीफखान हबीबखान (वय ३५) रा.उस्मानीया कॉलनी यास अटक करण्यात आली असून अन्य उस्मानीया कॉलनी, पटेल कॉलनी व अन्सारउल्ला नगर मधील ६० ते ७० संशयितांचा पोलीस शोध घेत आहे.



