भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील खडका रोड भागातील रहिवासी असलेल्या डॉक्टर कुटुंबियांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी १० लाख ३० हजारांच्या रोकडसह ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरटयानी लंपास केल्याची घटना घडल्याचे उघडकिस आले आहे . २४ मे ते १ जून दरम्यान ही धाडसी घरफोडी झाली .
५ मे रोजी दाम्पत्य घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रजा नगर, खडका रोड भागातील डॉ.सिलिंन मशहूर रजा सैय्यद यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली की घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी रोख रक्कमेसह दागिन्यांवर डल्ला मारला आहे. घरफोडीनंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक समाधान पाटील हे करीत आहेत.



