भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे लॉक डाउन सुरु असून आवश्यक साधन सामुग्री (वहन) ने आण करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवणार आहे . ज्या लोकांना जी काही सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळपासच्या स्टेशन येथे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा, मागणी नुसार गाड़ीची फेरी वाढविण्यात येइल असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे यात
पोरबंदर -शालीमार विशेष पार्सल गाड़ी :
गाड़ी क्रमांक – ००९१३ डाउन पोरबंदर – शालीमार विशेष पार्सल गाड़ी ही दिनांक ४ , ७, १०, १३, १६, १९, २२, २५ , २८, जून २०२० ला पोरबंदर स्टेशन हुन सकाळी ८ वाजता प्रस्थान करुन तिसऱ्या दिवसाला रात्री १.३० वाजता शालीमार स्टेशन ला पोहचेल .
गाड़ी क्रमांक ००९१४ अप शालीमार – पोरबंदर विशेष पार्सल गाड़ी ही दिनांक ६,१०,१४,१८,२२,२६,३० रोजी शालीमार स्टेशन हुन २२.५० वाजता प्रस्थान करुण तिसऱ्या दिवसाला १८.२५ ला पोरबंदर स्टेशनला पोहचेल .



