भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील पतंजली जेष्ठ नागरिक संघाची बैठक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान महादेव मंदिर येथे दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहात संपन्न झाली. बैठकीत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, अॅड. निलेश भंडारी व अॅड जास्वंदी भंडारी , पत्रकार उज्वला बागुल व संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग हरणकर, कोषाध्यक्ष अविनाश श्रावगे, उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांचे हस्ते पतंजली ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच प्रथेप्रमाणे गायत्री मंत्र व महामृत्युंजय मंत्र, व शांती मंत्र तुकाराम बाविस्कर यांनी सादर केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांना संघातील सदस्यांचे आप्त इष्ट व नातलग यांचे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
तसेच पतंजली संघाच्या सदस्यांचा वाढदिवस अतिशय सुंदररित्या साजरा करण्यात येऊन त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा देण्यात येऊन सन्मान करण्यात आला. तसेच. वाढदिवसानिमित्त श्री झटकर यांनी गीत सादर करून संगीतमय शुभेच्छा दिल्या .
प्रसंगी शिबिरात रिटेनर अॅड निलेश भंडारी व अॅड जास्वंदी भंडारी यांनी अॅडव्होकेट निलेश भंडारी यांनी अमली पदार्थ विरोधी जनजागृती, संवेदनशीलता व पुनर्वसन, अमली पदार्थांच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना, व्यसनमुक्ती व पुनर्वसन सेवा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच एलजीबीटीए समुदाय सदस्यांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर मदत व सहाय्य योजनांविषयी विशेष मार्गदर्शन केले.अॅडव्होकेट जास्वंदी भंडारी यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याविषयी माहिती देताना ज्येष्ठांनी आपल्या मालमत्तेची व संपत्तीची काळजी कशी घ्यावी, मृत्युपत्र कसे तयार करावे, वारसा हक्कासंबंधी माहिती , तसेच कौटुंबिक वादातून उद्भवणाऱ्या अडचणी यावर प्रकाश टाकला. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत समाधान केले. कार्यक्रमाचे आयोजक समांतर विधी सहाय्यक ( पीएलव्ही) उज्वला बागुल यांनी केले. यावेळी त्यांनी विधी सेवा समितीच्या कार्याचे महत्त्व विशद केले. समिती गरजू व वंचित घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरवते. लोकअदालतीचे आयोजन, कायदेविषयक जनजागृती, समुपदेशन व मध्यस्थी, विशेष घटकांना सहाय्य, कैद्यांना कायदेशीर मदत आदी उपक्रमांद्वारे सर्वांसाठी न्याय सुनिश्चित करण्याचे कार्य समिती करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कायदेविषयक माहिती पत्रके देऊन जनजागृती करण्यात आली तर संघाच्या कामकाजाचा आढावा देत वाढदिवस असलेल्या सदस्यांना शुभेच्छा देऊन तुकाराम बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले .
व
कार्यक्रमास पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाचे सचालक चंदन नागराजन, बी एस पाटील , डी एस पाटील व, भाऊराव सोनवणे , भास्कर वनाजी चित्ते , महिला पदाधिकारी बाविस्कर ताई व भोसले ताई , यांचेसह ज्येष्ठ पदाधिकारी सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता संघ संचालक डी एस पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली..



