भुसावळ(प्रतिनिधी ) -: शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात भव्य मिरवणूक काढत लेझीम व झांजच्या तालावर आकर्षक नृत्य सादर केले. शिस्तबद्ध संचलन, देशभक्तीपर घोषणा आणि पारंपरिक वेशभूषेमुळे वातावरण शिवमय झाले होते.
मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा सादर केला.

या देखाव्यातून शिवरायांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि जिजाऊंचे संस्कार प्रभावीपणे उलगडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या कार्यक्रमास मनोज बियाणी, डॉ. संगीता बियाणी, उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे, नगरसेविका सोनल महाजन, रजनी सावकारे, राजीव पारिक, प्रवीण भराडिया तसेच प्राचार्य डी. एम. पाटील यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे परिसरात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.



