भुसावळात छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) – सालाबादप्रमाणे यंदाही. तिथीप्रमाणे येणाऱ्या छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव ( शिवजयंती ) जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 17/02/2026, मंगळवार रोजी संध्याकाळी ठीक 5:00 वाजता श्री व्यंकटेश बालाजी मंदिर (पांडुरंग टाकीजच्या मागे), भुसावळ येथे बैठक होणार आहे.

बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन, नियोजन तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य पदाधिकाऱ्यांची निवड या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

भुसावळ शहरातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय व सर्व शिवप्रेमी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की खालीलप्रमाणे आयोजित बैठकीस
सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे असून बैठक वेळेवर सुरू होईल. वेळ अमूल्य आहे, याची नोंद घ्यावी. असे शिवप्रेमी उमाकांत शर्मा उर्फ नमा यांनी कळविले आहे .