बियाणी स्कूल व जुनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न :


भुसावळ(प्रतिनिधी ) – येथिल राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंम्मेलन दि.१६ रोजी संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरी करण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून औष्णिक विद्यूत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराले,प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे या होत्या. या वेळी विनोद बियाणी,स्मिता बियाणी,रोनक बियाणी,आयुषी बियाणी,मनीष बियाणी,आखिल भारतीय पारीक समाज म रा उपाध्याक्ष राजेश पारीक,प्रवीण भराडिया,जळगाव जि. आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष गोपाळ ठाकूर,बी एड कॉलेजच्या प्राचार्य कंचन जोशी,डी एम पाटील,आकाश इंगळे,सुशील नारखेडे, रुद्रसेन गंठिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनीनी उत्तमरीत्या शिवतांडव, शिवराज्याभिषेक सोहळा,साउथ इंडियन डान्स,राजस्थानी डान्स तसेच विवीध नृत्यांचे सादरी करण केले.
प्रसंगी राजेश मोराले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच रजनी सावकारे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन अलिना खान यांनी तर आभार प्रिंसीपल रुद्रसेन गंठीया यांनी मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथिल बियाणी पब्लीक स्कुल मध्ये वार्षिक स्नेह सम्मेलनात कलागुण सादर करतांना विद्यार्थी.