ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी निरोप देण्यात आला.यावेळी स्कूलच्या प्रिंसीपल निना कटलर, व्हाईसप्रिंसीपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,हर्षला चौधरी,रितू प्रभुदेसाई,वर्षा काळे, प्रतिभा काकडे,शेख कय्युम आदी उपस्थित होते.
या वेळी निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की पुढील महिन्यात परिक्षा असून चांगला व खुप अभ्यास करा. सकाळी लवकर उठून अभ्यास केल्याणे लक्षात राहते. तुम्ही जास्तीत जास्त मार्कस मिळवून उतीर्ण होऊन शाळेचे व परिवाराचे नाव रोषण करा. तसेच त्यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी एकमेकांना आगळा वेगळा पद्धतीन दिला निरोप.
या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून त्यावर सर्व मित्र मैत्रीणीच्या तसेच शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या करुण तसेच मैत्रीचा संदेश लिहून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप दिला.

शाळेचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी मित्रमंडळी एकमेकांपासून दूर जातील म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती.विद्यार्थ्यांनी देखील एकमेकांना शुभेच्छा देऊन निरोप दिला. सुत्रसंचलन सोफीया पिबॉडी यांनी तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थीनींनी निरोप समारंभ प्रसंगी शर्टावर स्वाक्षरी करून मैत्रिणींना निरोप देताना.