भुसावळ (प्रतिनिधी) 15 जानेवारी 2026: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या पत्रकार संघटनेच्या भुसावळ तालुकाध्यक्ष पदी संघरत्न सपकाळे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे संस्थापक अध्यक्ष व राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी यांच्या मान्यतेने पत्रकार संघाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली

या निवडीबद्दल विशाल दांडगे तालुकाध्यक्ष यावल यांनी सुद्धा अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघटनेची ध्येय धोरणे आणि कार्य मी प्रामाणिकपणे पार पाडीन.आपल्या संघटनेचे कार्यक्षेत्र वाढवून पत्रकारांचे मजबूत संघटन उभे करण्यावरती माझा भर राहील .असे नवनियुक्त तालुकाध्यक्षांनी सांगितले.


