निंभोरा येथे समता सैनिक दलातर्फे जागतिक धम्म ध्वजाला मानवंदना :

निंभोरा (ता. भुसावळ)-
भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत समता सैनिक दल महिला शाखा, निंभोरा यांच्या वतीने जागतिक धम्म ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी धम्म ध्वजास पुष्प अर्पण करून विधिवत पूजा केली. त्यानंतर उपस्थित सर्व महिला सैनिकांनी ‘जयभीम’च्या जयघोषात धम्म ध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास प्रज्ञा खंडारे, उषा सुरवाडे, रेखा हातोले, प्रद्मा मेश्राम, शीला साळवे, रत्ना नाईक, जयवंताबाई इंगळे, सीमा हातोले, प्राजक्ता सोनवणे, वर्षा सपकाळे, बनाबाई इंगळे, सपना खंडारे, त्रिगुणा खंडारे आदी महिला सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या उपक्रमातून बौद्ध धम्माचे विचार, समता, बंधुता व मानवतेचा संदेश समाजात पोहोचविण्यात आला.