कोरोना व लॉकडाउनच्या काळात भुसावळात पार पडला आदर्श विवाह सोहळा ; शासकीय नियमांचे काटेकोर पालन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉक डाऊन सुरु आहे . यामुळे सामूहिक कार्यक्रम , समारंभ, लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रम बंदच आहेत . अश्या परिस्थितीत धूम धड़ाक्यात होणाऱ्या लग्नसोहळ्यास फाटा देवून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत अत्यंत साधेपणाने येथील सोमाणी गार्डन परिसर भागात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदर्श विवाह मंगळवारी १२ में रोजी दुपारी संपन्न झाला. सोमाणी गार्डन भागातील रहिवाशी चंद्रशेखर इंगळे यांचा मुलगा श्रेयश चंद्रशेखर इंगळे याचा विवाह अरुण पाटील यांची कन्या सोनम पाटिल हीच्या सोबत ठरला होता .मात्र लॉक डाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वधु वर यांच्या पालकांनी चर्चा करून अतिशय योग्य निर्णय घेतला विवाह करण्याचे ठरवले
त्यानुसार सोशल डिस्टनसींग,सॅनिटायझर, मास्क या शासकीय नियमांचे पालन करण्यात आले .यावेळी विवाहासाठी आलेल्या मोजक्याच १० ते १५ व-हाडी यांनी सुद्धा तोंडाला मास्क लावून नियमांचे पालन केले. विवाहासाठी आलेले ब्राम्हण यांनीही काटेखोरपणे प्रशासनाच्या आदेशांचे पालन केले. याविवाहासाठी प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे,डॉ.प्रा.सुनील नेवे,नगरसेवक प्रमोद नेमाडे,नगरसेवक गिरीश पाटील उपस्थित होते.
कोरोनाच्या या गंभीर लढयात मुकाबला करतांना लॉकडाऊनमुळे सर्वत्र आर्थिकमंदीला सर्वानाच सामोरे जावे लागत आहे तेव्हा येणाऱ्या परिस्थितीत संपन्न झालेल्या या आदर्श विवाहाचे शहरात कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *