भुसावळ (प्रतिनिधी ) नगरपालिकेतील तीन प्रभागांमध्ये – प्रभाग ४ ब, ५ ब आणि ११ ब – आता २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. मतदान सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान होईल, तर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार, या तीन प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. इतर प्रभागांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान होते आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होती.
या निवडणुकीसाठी नावनोंदणी पूर्वी झाली होती. परंतु, उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाविरुद्ध तीन उमेदवारांनी – मेघा वाणी, वर्षा तावडे आणि परीक्षीत बर्हाटे – न्यायालयात अपील दाखल केली होती. न्यायालयाने मतदान अधिकार्यांचा निर्णय कायम ठेवला.
मेघा वाणी यांनी भावना पाटील यांचा अर्ज अपूर्ण असल्याचा मुद्दा मांडला होता, परंतु तो परिपूर्ण असल्याचे निकालात सांगण्यात आले.
वर्षा तावडे यांच्या अर्जासोबत खर्चविषयक हमीपत्र नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवला गेला. परीक्षीत बर्हाटे यांनी अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेतली होती.नावनोंदणीची अंतिम तारीख १० डिसेंबर आहे, आणि त्यानंतर कोणालाही नवीन अर्ज दाखल करता येणार नाही.
भुसावळ नागरिकांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे, कारण या तीन प्रभागांमध्ये नगरपालिकेतील राजकीय समीकरण ठरवणारा निकाल अपेक्षित आहे.


