भुसावळ,(प्रतिनिधी ) भुसावळ नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आज . 28 नोव्हेंबर 2025 – मतदान यंत्रांची तयारी करण्यात आली. यावेळी एकूण 191 मतदान केंद्रांकरिता 191 कंट्रोल युनिट तसेच 454 बॅलेट युनिट अशा मिळून 645 यंत्रांची तपासणी व तयारी करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे 25 कंट्रोल युनिट आणि 58 बॅलेट युनिट, अशी 83 अतिरिक्त यंत्रांचीही तयारी करून ठेवण्यात आली आहे. तसेच दोन बॅलेट युनिट असलेले 16 प्रभाग, तर तीन बॅलेट युनिट असलेले 9 प्रभाग असल्याने त्यानुसारही आवश्यक व्यवस्था करण्यात आली.
या यंत्रतपासणी व तयारीच्या कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी . जितेंद्र पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी . राजेंद्र फातले, नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार . हेमंत गुरव, तसेच मंडळ अधिकारी प्रफुल कांबळे, मंगेश परिसे आणि तेजस पाटील उपस्थित होते.
आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी सर्व संबंधित विभागांकडून आवश्यक त्या सर्व तयारीला वेग आला आहे.


