भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती 2025 तर्फे जामनेर रोडवरील नवशक्ती आर्केडजवळ गोल्डन अवर रुग्णालयातर्फे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरावर नागरिकांची तपासणी करण्यात आली.

30 रोजी स्मारकावर आतषबाजी
गुरुवार, 30 रोजी रात्री 12 वाजता भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर आतषबाजी करण्यात आली व स्मारकाचे पूजन व डीजे लाईट शो चे आयोजन करण्यात आले.आहे.
बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शुक्रवार, 31 रोजी शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयापासून ते लोहपुरूषांच्या स्मारकापर्यंत हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत सकाळी दुचाकी रॅली निघाली व रॅली स्मारकाजवळ आल्यानंतर नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिराला प्रतिसाद
शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्सजवळ शुक्रवारी सकाळी 11 ते 2 दरम्यान शहरातील गोल्डन अवर रुग्णालयातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदाब (बी.पी.), रक्ताची चाचणी (शुगर टेस्ट) तसेच ईसीजी काढून आरोग्याविषयी जागरूकता करीत आहाराबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. रुग्णालयाचे डॉ.आफताब शेख, नर्सिंग अधिकारी बरखा केशनिया व खुशी कासडे यांनी तपासणी केली. प्रसंगी शंभरावर नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णालयाचे पीआरओ गणेश वाघ तसेच जयंत उत्सव समितीचे अध्यक्ष धीरज बर्हाटे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


