भुसावळात कोरोनाग्रस्तांची संख्या सहावर सिंधी कॉलनीत दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह, सिंधी कॉलनी पुर्णतः सील

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात सलग चौथ्या दिवशी पुन्हा एक रुग्ण सिंधी कॉलनीत करोनाग्रस्त म्हणून आढळला यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहा झाली आहे. शहरात २५ एप्रिल पासून दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत आतापर्यंत शहरातील सहा पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सिंधी कॉलनीतील आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे सिंधी कॉलनी कॉलनीतील संख्या दोन झाली आहे. तर सध्या कोरोनाग्रस्त चार जणांवर उपचार सुरु आहेत. यापूर्वी आढळलेल्या करोनाग्रस्ताच्या घराजवळ दुसरा रुग्ण आढळल्याने सिंधी कॉलनी पुर्णतः सील करण्यात आली आहे. समतानगर डॉ. आंबेडकर नगर आणि सोपान कॉलनी या भागातील तिघांचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला होता. त्या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी कंटेन्मेंट झोनची निर्मिती करण्यात आली असून या परिसरात कोणालाही आतून बाहेर जाण्याची परवानगी नाही. दरम्यान शांतीनगर भागातील ज्या अपार्टमेंटमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला त्या अपार्टमेंटमधील काही कुटुंबीय घर सोडून गेले आहेत त्यामुळे प्रशासनासमोर त्यांना शोधण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. तसेच आरोग्य प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात येत असून पोलीस प्रशासनाकडूनाकडून पाहणी करण्यात येत आहे.
४नागरीकांना जळगावात तपासणीसाठी पाठवले -डॉ.किर्ती फलटणकर
सोमवारी आलेल्या अहवालात भुसावळातील दोघा मृतांसह शांती नगरात रहिवास करीत असलेल्या डॉक्टरांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता.
तर मंगळवारी प्रशासनाने पंचशील नगरातील मृत ६५ वर्षीय महिलेच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्या ११ लोकांना तसेच शांती नगरातील डॉक्टरांच्या पत्नीसह त्यांच्या दोघा मुलांना तसेच समता नगरातील ८२ वर्षीय मृताच्या कुटुंबातील सदस्यांसह शेजारच्या मिळून ११लोकांना जळगावात तपासणीसाठी हलवले आहे. एकूण २४ नागरीकांना तपासणीसाठी पाठविन्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *