अपंग व्यक्तीस मारहाण; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनीधी ) –
खडका गावात अपंग व्यक्तीस शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता खडका येथे आरोपींच्या राहत्या घरासमोर रोडवर सार्वजनिक जागेवर घडली.

फिर्यादी प्रविण बाळु धांडे (वय 50, रा. खडका, धंदा अपंग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,आरोपी राजेंद्र शालीग्राम कोळी, सुरज राजेंद्र कोळी आणि सरला राजेंद्र कोळी (सर्व रा. खडका) यांनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ केली.त्यानंतर आरोपी सुरज कोळी याने हातातील फायटरने फिर्यादीच्या डोळ्याखाली मारहाण केली.अन्य दोन आरोपींनीही हाताने मारहाण केली,असा आरोप फिर्यादीने केला आहे.या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, गुन्ह्यात वापरले गेलेले हत्यार (फायटर) जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज येऊलकर करत आहेत.