रोटरी रेलसिटी तर्फे किल्ले बनवा स्पर्धा ;


भुसावळ, ता. ११ (प्रतिनिधी ) – येथील रोटरी क्लब ऑफ रेल सिटी तर्फे मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे दिवाळी पर्वात घरोघरी बनविण्यात येणारे किल्ले. बाळगोपाळांना या संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रोजेक्ट चेअरमन डॉ मकरंद चांदवडकर यांनी दिली. पहिली ते आठवी यांचा एक गट आणि त्यापुढील वयोगटाच्या मुलांसाठी खुला गट अशा दोन विभागांत परीक्षण होणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र असे स्पर्धेचे स्वरूप असणार आहे.किल्ल्याची बांधणी,सजावट,प्रकाश योजना ,सामाजिक संदेश या बाबी लक्षात घेऊन विजेते निवडले जाणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी 19 ऑक्टोबर पर्यंत 9423756658 किंवा 9923448841 या क्रमांकांवर किल्ल्यासोबत काढलेला स्वतःचा फोटो आणि थोडक्यात माहिती व्हॉट्सॲप करावी असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमीतसिंग माखन, प्रोजेक्ट चेअरमन डॉ मकरंद चांदवडकर,को चेअरमन अमित भडंग यांनी केले आहे