भुसावळ (प्रतिनिधी ) – नवरात्री उत्सव निमित्त भुसावळ येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी दत्तक घेतलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक दोन मधील कुमारीकांचे विधिवत पूजन केले. या शाळेत सर्व वीट भट्टी कामगारांचे मुले शिक्षण घेतात. तेथील सर्व मुलींना आणि मुलांना सुद्धा खालील प्रमाणे भेटवस्तू दिल्या. सुरुवातीला तेथील मुलींचे पूजन करण्यात आले आणि त्यांना फ्रॉक, सफरचंद, राजगिऱ्याचे लाडू,चिप्स, शृंगार आणि हेअर पिन सप्रेम भेट देण्यात आल्या. सर्व मुलं मुली आणि शिक्षकांना क्लब तर्फे अल्पोपहार देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी क्लबचे सदस्य मोना भंगाळे, मीनाक्षी धांडे, कविता पाचपांडे, सुनिता पाचपांडे, किरण पोलडीया,संध्या वराडे,अनिता महाजन, विनिता नेवे तसेच अध्यक्ष सीमा सोनार व सचिव योगिता वायकोळे यांनी प्रायोजकत्व स्वीकारून मेहेनत घेतली. सर्व क्लब सदस्यांनी मदत केल्यामुळे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे चेहरे प्रफुल्लित झाले आहेत व त्यांना रोज शाळेत येण्याची आवड निर्माण होईल असे मत शाळेचे शिक्षक नरेंद्र कोळी यांनी याप्रसंगी व्यक्त केले आणि आभार मानले.



