पाचोरा (प्रतिनिधी ) – विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगलेल्या १८ तलवारीसह एकाला पाचोरा पोलिसांची अटक करून मोठी कारवाई केली आहे

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक . राहुलकुमार पवार यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, माहिजी नाका, पाचोरा येथे एक इसम शहरात विक्रीसाठी अवैध तलवारी घेऊन आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी संशयीत आरोपी सोहेल शेख तय्युब शेख (वय २४ वर्षे, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि विक्रीसाठी आणलेल्या एकूण १८ तलवारी, ज्यांची एकूण अंदाजे किंमत ५४,०००/- रुपये आहे, त्या लपवलेल्या ठिकाणाहून काढून दिल्या. त्याने काही तलवारी पूर्वीच विकल्याचे देखील सांगितले.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४६०/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अन्वये १९ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई . पोलीस अधीक्षक . महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ व कैलास ठाकूर, पोलीस कर्मचारी संदीप राजपूत , जितेंद्र पाटील आणि हरीश परदेशी यांनी ही कारवाई करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


