भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवाडयाचा प्रारंभ

भुसावळ ( प्रतिनिधी) –

भुसावळ येथे शासकीय आदेशा नुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानाचा प्रारंभ नुकताच लोणारी मंगल कार्यालयात संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,प्रांताधिकारी जितेंद्र पाटील ,तहसीलदार नीता लबडे ,डीवायएसपी संदीप गावित , भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, वरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन राऊत सचिन राऊत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव दमाळे अन्य अधिकारी गण उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार निता लबडे यांनी केले .

या प्रसंगी दिपप्रज्वलन करून व लाभार्थ्याना प्रमाण पत्र वितरण करून छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानाचा प्रारंभ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले .

उयावेळी राज्याचे वस्रोदयोग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की प्रशासन सामान्य नागरिकांसाठी कायदे तयार करत असते कायद्याची अंमलबजावणी करणे हे अधिकाऱ्यांच्या कर्तव्य असून अशा पंधरवड्यामधून तसेच योजनेतून नागरिकांना सुलभ पद्धतीने लाभ घेता येतो .
शेतकऱ्यांना रस्ते व अतिक्रमित जमिनी बाबत यांचा लाभ मिळतो .
यावेळी बचत गट तसेच श्रावण बाळ योजना नगरपालिका आदी योजना लाभार्थीचा सन्मान सुद्धा देऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार निता लबडे या मॅडम यांनी केले .
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सदर पंधरवाडा चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये थकबाकी वसुली , जिवंत सातबारा योजना, पानंद रस्त्याच्या नोंदी ,शेतकरी आत्महत्या पीडित कुटुंबाच्या भेटी देणे व त्यांना योजना सांगणे , स्मशान भूमीच्या अतिक्रमण काढणे , महाविद्यालयीन शिबिरे व जिवंत रेशन कार्ड आदी योजना गावोगावी राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .
नागरिकांच्या दारापर्यंत शासकीय सेवा पोचवणे आणि थेट दिलासा देणे हा पण सेवा पंधरवाड्याला उद्देश असून या सेवांचा लाभ सुलभ पद्धतीने नागरिकांना घेता येणार आहे .
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घेणे आवश्यक आहे व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लाभ मिळवून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे . भुसावळ नगरपालिकेचे लवकरच महानगरपालिकेमध्ये रूपांतर होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले .
याबाबत हालचाली सुरू असून पुढील निवडणूक महानगरपालिकेच्या असू शकतात .
यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की प्रशासन सामान्य नागरिकांसाठी कायदे तयार करत असते कायद्याची अंमलबजावणी करणे हे अधिकाऱ्यांच्या कर्तव्य असून अशा पंधरवड्यामधून तसेच योजनेतून नागरिकांना प्रमाण पत्र मिळविण्याचा सहज पणे लाभ घेता येतो .
या योजनेअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी मंत्रिमंडळ यांनी केले आहे .तहसील कार्यालयातून विविध नागरिकांचे कामे सहज होत असून यापूर्वीसुद्धा तहसीलदार यांनी अशा योजना राबवल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
कार्यक्रमात बचत गट, श्रावण बाळ योजना , दिव्यांग योजना , नगरपालिका , आदी योजना लाभार्थींना प्रमाणपत्र व धनादेश वितरित करण्यात आले .या ठिकाणी महसुल विभागातील विविध योजनांचे स्टाल लावण्या देऊन माहिती देण्यात येत होती .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महसूल विभाग , नगरपालिका, आरोग्य विभाग , अंगणवाडी सेविका शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .