आज भुसावळात ओबीसी आरक्षण संदर्भात प्रांत अधिकारी यांना देणार निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील तमाम ओबीसी प्रवर्गातील समाज बांधवांना कळविण्यात येते की, ओबीसी आरक्षण संदर्भात चालू स्थिती पाहता जर आपण वेळीच सावध होऊन एकत्र नाही आलो तर आपले ओबीसी आरक्षण हे नावापुरतेच राहील म्हणून आपण मराठा आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र शासनाने जो जी.आर. काढला आहे. त्या संदर्भात हरकत नोंदविणे बाबत भुसावळ येथील मा. प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी
मंगळवार दि. ९/९/२०२५ रोजी दुपारी १२ वा. प्रांत ऑफिस भुसावळ
येथे मोठ्या संख्येत ओबीसी प्रवर्गातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे. असे आवाहन अ. भा. महात्मा फुले समता परिषद, भुसावळ तालुका व सकल ओबीसी समाज भुसावळ तालुका यांनी केले आहे