जय गणेश फाउंडेशनच्या समूह नृत्य स्पर्धेत ‘राधे राधे ग्रुप’ प्रथम: पारिताेषिक वितरण : कलाजागरने भुसावळच्या लाैकीकात भर पडणार- डीवायएसपी संदिप गावित:

भुसावळ (प्रतिनिधी ) – जय गणेश फाउंडेशनने गणेशाेत्सवात जाे कलाजागर केला ताे भुसावळच्या लाैकीकात भर घालणारा आहे. फाउंडेशनने गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीपेक्षा भक्तीची उंची वाढली पाहिजे असा जाे संदेश दिला ताे जिल्ह्यासाठी आदर्श आहे असे गाैरवाेद‌्गार डीवायएसपी संदीप गावित यांनी येथे काढले. गणेशाेत्सवात घेतलेल्या स्पर्धांच्या पारिताेषिक वितरण साेहळ्यात ते बाेलत हाेते. समूहनृत्य स्पर्धेत ‘राधे राधे ग्रुप’ प्रथम तर गिरीजा आराेही ग्रुप द्वितीय क्रमांकाचा माकरी ठरला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गाैरवण्यात आले.
व्यापीठावर पाेलिस निरीक्षक राहूल वाघ, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे, जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची उपस्थिती हाेती. प्रा.गिरीष कुलकर्णी,यांनी जय गणेश फाउंडेशनचे सांस्कृतिक कार्यक्रमातुन असंख्य कलावंत घडत असल्याने हे एक आयडाॅल आहे. उपक्रमातील सातत्य हे पथदर्शी आहे. स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र पाटील यानीही मनाेगत व्यक्त केले. कलात्मकता, सूत्रबद्धता, नियाेजन कसे करावे हे या फाउंडेानकडून शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव तुकाराम आटाळे प्रकाश चौधरी, सुधीर देशपांडे, राजेंद्र चोरडिया, कोषाध्यक्ष राहुल भावसेकर, समन्वयक गणेश फेगडे यांचीही उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन हर्षल वानखेडे, साक्षी चौधरी यांनी केले. गणेशाेत्सवात सलग दहा दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करून त्यांची अंमलबजावणी करणारे आदर्श मंडळ म्हणजे जय गणेश फाउंडेशन हे हाेय अशा शब्दांत महेंद्र मांडे यांनी पदाधिकाऱ्यांचे काैतुक केले.

स्पर्धांतील प्रमुख विजेते असे
प्रश्न मंजुषा स्पर्धा : प्रथम हर्ष राठी, द्वितीय प्राची चौधरी, उत्तेजनार्थ रिद्धी पाटील.
रंगभरण स्पर्धा : लहान गट : प्रथम केतकी राठोड, द्वितीय ईश्वरी महाजन, उत्तेजनार्थ शर्वरी महाजन. मोठा गट : प्रथम रणवीर जोनवाल, द्वितीय हिमानी कोलते, उत्तेजनार्थ हेतल राठोड.
रांगोळी स्पर्धा : प्रथम देवयानी कोलते, द्वितीय हेतल राठोड, उत्तेजनार्थ प्रांजल चौधरी.
सोलो डान्स : लहान गट : प्रथम नुपूर भालेराव, द्वितीय गिरीजा सावदेकर, उत्तेजनार्थ : फलश्री चौधरी. मोठा गट : प्रथम साक्षी कुलकर्णी, द्वितीय लावण्य सनान्से, उत्तेजनार्थ रमनस्वी बारजीभे.
ग्रुप डान्स लहान गट : प्रथम राधे राधे ग्रुप, द्वितीय गिरीजा आरोही, उत्तेजनार्थ लिटिल प्रिन्सेस. माेठा गट : प्रथम हिप टॉप, द्वितीय नंदाणे अँड विद्या.
होम मिनिस्टर : प्रथम कल्याणी पंकज अट्रावलकर,द्वितीय क्रमांक माधुरी चौधरी.