भालचंद्रनगरच्या राजाने दिला व्यसनमुक्तीचा संदेश


भुसावळ (सा वा ) – येथील प्रभाकर हॉल परिसरातील भालचंद्र नगर मध्ये दरवर्षीप्रमाणे घरगुती गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली आहे. या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा गणेशोत्सवाच्या आरास मध्ये व्यसनमुक्ती वरील पोस्टर्स चे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे परिसरात आणि गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती होत होती.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्स च्या माध्यमातून हे जनजागृतीचे कार्य साध्य होत आहे. या साठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेसाठी नाशिक विभागीय संघटक प्रमुख म्हणून कार्यरत असणारे डॉ दयाघन राणे यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन उपलब्ध करून दिलेले आहे.
या गणेशोत्सवाचे स्वरूप घरगुती असले तरी संपूर्ण भालचंद्र नगरवासी या गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. म्हणून भजन, खेळ आणि बालगोपालांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भालचंद्र नगर मधील प्रत्येक घरातील सर्वजण या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे सामाजिक एकता, बंधुता आणि समाज जागृतीचे उद्दिष्ट या माध्यमातून साध्य होत असताना दिसत आहे हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ठ आहे.
हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भालचंद्र नगर मधील रहिवासी प्रा डॉ गजानन जाधव, श्री अशोक चौधरी, श्री अशोक सरोदे श्री निखिल कोलते, श्री चंद्रकांत चौधरी, श्री तुषार चिंधडे, श्री प्रमोद पाटील, श्री बापू पाटील, श्री पवन पाटील, श्री जीवन पाटील, श्री. संदीप कोलते, श्री दिलीप ढाकणे, श्री राजेश जोशी. श्री किशोर कांबळे, श्री शिरीष पिंपळे, श्री विजय महाजन, प्रा आशिष महाजन, श्री किशोर नारखेडे श्री अजय महाजन श्री डी टी किरंगे परिश्रम घेत आहेत.

भालचंद्र नगर मधील व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी केलेली ही आरास येणारा जाणाऱ्या ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.