अंतर्नाद’तर्फे गणेशोत्सवात एक दुर्वा समर्पणाची उपक्रम ; यंदा उपक्रमाचे ९ वे वर्ष, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवाचे औचित्य साधून ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम गणेशोत्सव काळात राबवण्यात येणार आहे. गणेशाेत्सवाच्या खर्चात बचत करून वंचित, गरजू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करायचे, असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे नववे वर्ष आहे.

गणेशाेत्सवात वारेमाप हाेणाऱ्या खर्चात बचत करण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी केले जाते. गणरायाला दुर्वा म्हणून शैक्षणिक साहित्य अर्पण करून ते गाेरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करायचे, असा हा साधा आणि साेपा उपक्रम आहे. यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष आहे. गेल्या आठ वर्षांत तब्बल ३३ शाळांमध्ये किमान २७७५ गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि रावेर तालुक्यातील शाळा निवडून हे साहित्य वाटप करण्यात आले. यंदाही ग्रामीण व शहरी भागातील शाळांची निवड करून त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.त्यात दप्तर, पाटी, पेन्शील, वह्या, पेन, कंपासपेटी, गणवेश, पुस्तक या साहित्याचा समावेश असेल. अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ राेवली आहे. ज्या दात्यांना शक्य असेल त्यांनी उपक्रमात सहभागी होऊन शालेय साहित्य मदत म्हणून संस्थेस देण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील, प्रकल्प समन्वयक कपिल धांडे, प्रकल्प सह समन्वयक केतन महाजन यांनी केले आहे.

उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदिप सोनवणे, डॉ.संजू भटकर, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, हितेंद्र नेमाडे, अमित चौधरी, समाधान जाधव, देव सरकटे, राजू वारके, हरीश भट, डॉ.प्रा.श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन,भूषण झोपे,उमेश फिरके, विपिन वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, ललीत महाजन, शिरीष कोल्हे, प्रमोद पाटील, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे, मंगेश भावे, अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.