भुसावळात विवेकानंद विद्यामंदिरमध्ये चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – विवेकानंद विद्यामंदिर, भुसावळ येथे गोकुळाष्टमी गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. सोबतच पालक सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. पालक सभेदरम्यान शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. यात मोठ्या संख्येने पालकांनी सहभाग नोंदवीला त्यानंतर शाळेतील चिमुकल्यानी थर लावून दहिहंडी फोडत उत्सव केला . या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि जोशाने सहभाग घेतला.
ताज्या गोड चवीच्या दहीहंडीच्या परंपरेला अनुसरून, विद्यार्थ्यांनी मानवसाखळी तयार करून (थर ) लावूत दहीहंडी फोडली. शाळेच्या प्रांगणात रंगलेल्या या उत्सवात एकजूट आणि सहकार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले गेले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष जयंतीलाल सुराणा उपाध्यक्ष अक्षय सराफ,सचिव . सुरेश शर्मा, हर्षद बोरवणकर तसेच मुख्याध्यापिका सुनंदा खरे आणि विद्यालयाच्या शिक्षक शिक्षिका व पालकांची उपस्थिती होती.
हसी -खुशीच्या वातावरणात सर्व विद्यार्थी दहीहंडी फोडण्यासाठी एकत्र आले आणि ‘गोविंदा आला रे आला’ या गजरात मस्ती केली. प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी “दहीहंडी उत्सव केवळ खेळ नाही, तर हा आपल्याला एकमेकांच्या सहकार्याने मोठे कार्य करण्याची प्रेरणा देणारा आनंदोत्सव आहे असे सांगून महत्त्वाची शिकवण दिली. .
संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि विद्यार्थ्यांनी त्याचा भरपूर आनंद घेतला. दहीहंडी उत्सवात सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्सव यशस्वी करण्यात मोठा सहभाग होता.