काल धरणगांव येथे मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने धरणी चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले, शहरात बरेचशा घरांची पडझड झाली त्या मधे संसाराच्या सामानाचे नुकसान झाले, हे वृत्त समजताच सकाळी ७ वा शिवसेना उपनेते गुलाबरावजी वाघ,.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी,शहर प्रमुख भागवत आप्पा चौधरी, सुरेश गोविंदा महाजन, व्यापारी सेनेचे दिनेश वाणी, रणजित पुरभे, गजानन माळी, राहुल रोकडे आबा महाजन ,व व्यापारी यांनी सर्व पाहणी केली,व तात्काळ प्रांताधिकारी व तहसीलदार, मुख्याधिकारी धरणगांव, सर्कल, तलाठी यांच्याशी संपर्क करुन ताबडतोब पंचनामा करणे,पाहणी करणे संदर्भात सुचना/विनंती केली.या नुकसान ग्रस्ताना नुकसान भरपाई मिळावी अशी ही मागणी केली.ताबडतोब यंत्रणा पाठवतो व आम्हीही येतो असे तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी सांगितले.



