भुसावळ (प्रतिनिधी ) – नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रदेवतेला कृतज्ञता व्यक्त करणे त्यासाठी पर्यावरणपूरक वातावरणाची आवश्यकता आहे म्हणून सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन असे आवाहन पर्यावरण मित्र सुरेंद्रसिंग पाटील. यांनी केले आहे .

नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व मच्छीमार हे मनोभावे त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून असल्याने त्यांचे कर्तव्य कृतज्ञता म्हणून समुद्रदेवतेची पूजा नारळ अर्पण करून या दिवशी करतात. या दिवशी पूजा केल्याने समुद्रदेवतेवर कितीही संकट आली तरी समुद्रदेवता आपले रक्षण करते. व आपणास सर्व संकट आपल्यावर घेऊन आपणास सुख, समृद्धी देते श्रावण महिना हा धार्मिक कार्यक्रमासाठी पवित्र मानला जातो भगवान शंकर यांचा आवडता महिना आहे नारळाला तीन डोळे त्रिनेत्रदारी भगवान शंकराची आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची मनोभावे पूजा करतात ज्या पद्धतीने समुद्रदेवता समस्त मच्छीमारांचे संरक्षण करतात डॉ .सुरेंद्रसिंग पाटील .पर्यावरण जागर प्रतिष्ठान सद्यस्थितीत समुद्र सुद्धा थेट गावातील नदी नाले याद्वारे समुद्रात येणाऱ्या दूषित व खराब पाण्यातून येणारा कचरा प्लास्टिक औद्योगिक व दूषित पाणी थेट समुद्रात जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत समुद्रातील प्रजातीयांची संख्या कमी प्रमाणात होऊन संतुलन बिघडत आहे तसेच ऑक्सिजनच्या कमी होण्याने व्हेल कासव व अन्य काही समुद्रातील प्रदूषित घटकांमुळे प्रजनन शक्ती कमी कमी होत आहे सद्यस्थितीत प्लास्टिकचा खूप मोठा स्त्रोत तसेच अनेक प्रकारचा घातक कचरा समुद्रात येत असल्यामुळे गंभीर संकट निर्माण झालेला आहे समुद्राचा संतुलन बिघडत आहे त्यामुळे अनेक समुद्री जीवांवर परिणाम होत आहे त्यांना आजार लागत असून त्याचा परिणाम मानवावर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे समुद्र प्रदूषित न होता त्यासाठी नद्या नाले स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प या पवित्र महिन्यापासून करूया व निसर्गनिर्मित समुद्रातील संतुलन टिकवण्यासाठी तेथील सर्व सजीवांचे जीवन सुरक्षित ठेवू या असे आवाहन केले आहे


