शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात १९ रोजी बैठकीचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना पक्षप्रमुख,तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत याकरिता यासंदर्भात शिवसेना खा.संजय राऊत ,उपनेते संजय सावंत यांच्या आदेशाने शिवसेना नेते तथा रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ , जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत विधानसभा संपर्कप्रमुख संजय गोवेकर , यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शनिवार १९ जुलै रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता शासकीय विश्रामगृह यावल रोड,भुसावळ येथे आयोजीत केली आहे,

या नियोजन बैठकीस भुसावळचे शिवसेना माजी आमदार
दिलीप भोळे, माजी जिल्हाप्रमुख ऍड जगदीश कापडे,
माजी नगराध्यक्षा श्रीमती माधुरीताई फालक , तालुकाप्रमुख निलेश महाजन, उपजिल्हा समन्वयक प्रा उत्तम सुरवाडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप सुरवाडे , माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, अँड. श्याम श्रीगोंदेकर,
यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहे .
तरी नियोजन बैठकीस भुसावळ विधानसभेतील सर्व शिवसेना उबाठा पदाधिकारी, महीला आघाडी पदाधिकारी ,युवा सेना,, रेल कामगार सेना ,शिक्षक सेना,, अल्प संख्यांक सेना , , उत्तर भारतीय सेना, भीम शक्ती शिवशक्ती सेना,, शिव वाहतूक सेना,यांचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे,
असे आवाहन शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख निलेश महाजन यांनी केले आहे,,