भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण समारंभ बुधवार दि १६ रोजी शहरातील रोटरी हॉल येथे संध्याकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर पूनम कोचर,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.राजेश पाटील व पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजीव शर्मा यांची उपस्थिती राहणार आहे. अनंत पाटील यांच्या कडून अध्यक्ष पदाची सूत्रे संजय चापोरकर तर आरती चौधरी यांच्याकडून सेक्रेटरी पदाची सूत्रे रत्नाकर क्षीरसागर हे घेतील.कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याचे आवाहन नुतन अध्यक्ष संजय चापोरकर यांनी केले आहे.


