भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील अमृत योजनेच्या टप्पा दोन मधिल दिलेल्या कामाचे ठेकेदाराकडून वेळेवर काम चालू न झाल्यामुळे सदरचे काम काढून घेवून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सामजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी भुसावळ नगरपालिका प्रशासक जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अमृत योजना टप्पा दोनला दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदार (मक्तेदार) यांना देण्यात आला होता. मात्र पाच महिने होवूनही अद्यापपर्यंत कुठलेही काम चालू केलेले नाही. याबाबत संंबंधित ठेकदाराची चौकशी होवून सदरील ठेकेदाराकडून अमृत योजना टप्पा दोनचे काम काढून घेण्यात येवून या ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्यात यावे, अशी मागणी भुसावळ नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे.