भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात शिक्षणासाठी व कामानिमित्त
यवतमाळ व अमरावती जिल्हातील २२ विद्यार्थ्यांची
मेस बंद , हॉटेल बंद, कोणतेही काम नाही यामुळे खिशात पैसा नाही अशी बिकट अवस्था झाली आहे . या विद्यार्थ्याना मेस बंद झाल्यामुळे जेवण सुद्धा मिळत नाही . याकरीता येथील श्रीराम नगर भागातील मृत्युंजय मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना रोजच्या जेवणाची व्यवस्था करून देत मदतीचा हात दिला आहे ,
गेल्या ५ दिवसांपासून दररोज सकाळ संध्याकाळ बेसन पोळी व – खिचडी- फोडणीचे वरण व – खिचडी- आलू मटरची भाजी, पोळी व पिठलं पोळी,शेवभाजी पोळी व खिचडी, बटाट्याची भाजी ,पोळी याप्रमाणे जेवण देण्यात येत आहे .
दरम्यान या 22 विद्यार्थ्यानी खासदार रक्षा खडसे , आमदार संजय सावकारे यांचेकडे आपल्या जिल्ह्यात जाण्यास मदत करावी असे आवाहन केले आहे .


