भुसावळ (प्रतिनिधी )- आषाढी एकादशी निमित्त बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वारी पंढरीची गजर हरिनामाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनीं व शिक्षकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात नृत्य करीत विठू माऊलीच्या दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची पूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी भक्ती प्रधान नृत्य सादर केली.गिरीश पाटील या विद्यार्थ्याने कन्नडा राजा पंढरीचा हे भक्ती गीत उत्कृष्टपणे सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ शहराच्या नगराध्यक्षा शैलजा नारखेडे,पुरुषोत्तम नारखेडे,उपाध्यक्ष विनोद बियाणी , सचिव डॉ.संगीता बियाणी,डायरेक्टर स्मिता बियाणी, आयुषी बियाणी, विशेष अतिथी म्हणून राजीव पारिख,प्रवीण भराडीया,प्राचार्य डि एम पाटील,डॉ.एम एन पवार उपस्थित होते. याप्रसंगी बियाणी एज्युकेशनचे विविध संस्थांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. फोटो कॅप्शन - भुसावळ येथे बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये काढण्यात आलेल्या दिंडीत प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे,मनोज बियाणी,डॉ.संगिता बियाणी,पुरुषोत्तम नारखेडे,डॉ.एम एन पवार,प्राचार्य डि एम पाटील व विद्यार्थी.


