भुसावळ (प्रतिनिधी ) – श्रीप्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेने भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वॉर्ड येथील प्राचीन श्री बड़ा हनुमान मंदिरा तर्फे नवनवीन धार्मिक व सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात .मंदिरातर्फे दर शनिवारी सायंकाळी ठीक ७ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अनुषंगाने दिनांक ११ जानेवारी २०२५ ला या उपक्रमाचा हा 51 वां शनिवार आहे .

जात-पात विसरून सकल हिंदू समाजाचे संघटन करणे , हिंदू धर्माचे व आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणे , देश अखंड रहावा व संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात श्री बड़ा हनुमान मंदिरा तर्फे करण्यात आली आहे .हा उपक्रम भुसावळ शहरा व्यतिरिक्त संपूर्ण भारतभर याचा प्रचार प्रसार करण्याचा संकल्प श्री बड़ा हनुमान मंदिर भक्त परिवारा तर्फे करण्यात आला. आहे .प्रत्येक शनिवारी सायंकाळी ठीक ७ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण होते, नंतर हनुमंताची सामूहिक आरती उपस्थित सर्व भाविकांच्या हस्ते करण्यात येते , तत्पश्यात उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करून संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे म्हणून प्रार्थना केली जाते. भुसावळ शहरातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
फक्त १० मिनिटांच्या या उपक्रमाला भुसावळ शहरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वीस जणांनी सुरुवात केलेल्या या उपक्रमाला अल्पावधीतच शेकडो भाविकांची उपस्थिती होत असते . तसेच मंदिराच्या प्रेरणेने भुसावळ शहरात विविध 5 ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात झाली आहे
सामुहीक हनुमान चालीसा पठण चे महत्व*
श्री हनुमान चालीसा हे नुसती चालीसा नसून हनुमंताला समर्पित एक लोकप्रिय शक्तिशाली मंत्र आहे .यामध्ये ४० छंद म्हणजे चौपाई समाविष्ट आहे .ज्यामध्ये हनुमानाचे गुण तसेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रति त्यांची निष्ठा व एक विश्वासू सेवक ज्याने अनेक भूमिका त्यात निभावली आहे याचं वर्णन हे हनुमान चालीसा मध्ये केलेले आहे. हनुमान चालीसा पठण केल्याने मात्र ११ दिवसांच्या साधनेने ग्रहांचे अशुभ परिणाम पूर्णपणे नष्ट होतात.
*सामूहिक हनुमान चालीसा केल्यानंतर वातावरणामध्ये जी एक अद्भुत अशी ऊर्जा निर्माण होते तीच ऊर्जा आपल्या कामांना गती देण्यासाठी व आपले कार्य सफल करण्यासाठी आपल्याला मदत करते असे श्री बड़ा हनुमान मंदिराचे महंत श्री प्रशांत रामदासजी वैष्णव यांनी सांगितले .
अशा या विशेष ५१ व्यां सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत अग्रवाल यांच्या तर्फे “हनुमान चालीसा तोंडी पाठ” या स्पर्धेत भाग घेतलेल्या लहान मुला मुलींना प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या 51 व्यां विशेष सामुहीक हनुमान चालीसा पठणनाला विशेष उपस्थिती , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघ चालक राजेश जी पाटील , जिल्हा संघ चालक डॉ. विजय सुंदरलाला सोनी
शहर संघ चालक डॉ अरविंद गाजरे
तसेच देवगिरी प्रांताचे कार्यकारणी सदस्य .प्रशांत देवरे ,बौद्धिक सह प्रमुख प्रकाश जी चौधरी तसेच अन्य हिंदुत्व वादी संगटनेचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
*अशा या 51व्या शनिवारी म्हणजे पौष शुक्ल द्वादशी या तिथीला मागील वर्षी 22 जानेवारी 2024 ला प्रभू श्री राम आपल्या स्वतःच्या मंदीरात 500 वर्षा नंतर स्थानापन्न झाले. अशा या दुग्ध शर्करा योगा निमित्त भुसावळातील तसेच परिसरातील नागरिकांनी या सामूहिक हनुमान चालीसा पठणाला फक्त दहा मिनिटांची उपस्थिती द्यावी असे आवाहन श्री बड़ा हनुमान मंदिर भक्त परिवारा तर्फे करण्यात येत आहे.


