४ गावठीकट्टे, २० जिवंत काडतुससह मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात ; भडगाव पोलिसांची मोठी कारवाई ;

भडगाव – तालुक्यातील पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेचे सुमारे चार गावठी 20 जिवंत काडतूस विनापरवाना घेऊन येताना मध्ये प्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाईत एक लाख 70 हजार रुपयाची मुद्देमाल सहित आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के पोलिस हेड कॉन्स्टेबल परवीन परदेसी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्रम्हनकर पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनवणे आदिनी केली
या बाबत आधिक माहिती अशी की,फिर्यादी -पो. कॉ. प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ रोजी रात्री तीन वाजे सुमारास भडगांव ते एरंडोल रोडवर पिंपरखेड गावाच्या अलीकडेस आरोपी सुनिल बिलदार बारेला(वय ३५) रा. उमरटी. ता. बारला जि. बडवाणी मध्य प्रदेश हा ०४ गावठी बनावटी पिस्टल, २० जिवंत काडतुस यामध्ये २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस काळयारंगाची प्लेट , २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस काळया रंगाची प्लेट २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस लाल रंगाची प्लेट तिवर गोलाकार स्टारची नक्षी असलेली २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस लाल रंगाची प्लेट तिवर गोलाकार स्टारची नक्षी असलेली , २०,०००/- रु. कि. गावठी बनावटीची पिस्टलचे २० जिवंत काडतुस , ५०,०००/- रु. कि, बजाज प्लॅटीना कंपनीची मो. सा. क्रमांक एम पी ४६ झेड बी ४७६२ जु. वा. , ३००/- रु. कि. हिरवट रंगाची बंग तिवर इंग्रजीत बॅग गियर लिहलेले जु. वा. कि. अं. एकूण १,७०,३००/- रुपये विना परवाना कब्ज्यात बाळगतांना मिळून आला म्हणून भडगांव पोलीस स्टेशन गु. र. न. १०/२०२५ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .

पुढील पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मस्के ,व पीएसआय सुशील सोनवणे, संदीप सोनवणे परविन परदेशी निलेश ब्रह्मणकर, महेंद्र चव्हाण, हे करत आहे