भुसावळात वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस साजरा ;

भुसावळ – येथील देवगिरी कल्याण आश्रम तालुका समितीतर्फे नुकताच वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या जयंती निमित्त वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस साजरा करण्यात आला . प्रारंभी वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुवर्णा गाडेकर यांनी केले . यावेळी समितीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या अँड जास्वंदी भंडारी यांनी यांनी देवगिरी कल्याण आश्रमाचे कार्य त्या माध्यमातून विविध आयाम याविषयी माहिती सांगितली . यावेळी सक्षम नारी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सुवर्णा गाडेकर व सर्व सहकारी सदस्य उपस्थित होते . अ.भा.कार्यकारिणी सदस्य श्री ठाकुर यांनी ही भेट दिली . यावेळी श्री ठाकूर यांनी वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचे जिवन चरित्रावर प्रकशझोत टाकून संघटनेचा स्थापने पुर्ण प्रवास विषद केला .

देवगिरी कल्याण आश्रमच्या तालुकाध्यक्षा मंजुषा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते . यावेळी जिल्हा समितीच्या महिला कार्यकर्त्यां अँड चित्रा आचार्य , अँड जयश्री देशमुख , व तालुका समितीच्या उज्वला बागुल यांचेसह तालुका व जिल्हा समितीच्या महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या .