भुसावळात भीमा कोरेगाव युद्धात शहीद झालेल्या योद्धांना मानवंदना ;

भुसावळ – येथील गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात 207 वा शौर्य दिनी दिनांक 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या भीमा कोरेगाव युद्धात शहीद झालेल्या योद्धांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी भदंत संघरत्न महाथेरो यांनी धम्मदेसना देऊन भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धाविषयी माहिती दिली. तसेच डॉ. प्रा. मनोहर संदानशिव सर यांनी भीमा कोरेगाव युद्ध कसे घडले याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच एस के प्रसन्नदर्शी, वर्षा ठाकरे, रत्ना सोनवणे ,कविता रायपुरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तेजस्विनी केदारे, व एस एस केदारे यांनी भीमा कोरेगाव यावर गीत गायन सादर केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीता तायडे तर आभार प्रदर्शन पौर्णिमा केदारे यांनी केले . कार्यक्रमाला शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे हे देखील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीच्या लेकी गृप यांनी परिश्रम घेतले.यावेळी
पंढरीनाथ नगर, अमरनाथ नगर, गुलमोहर कॉलनी तसेच नहाटा परिसर येथील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते