पु ओ नाहाटा महाविद्यालयात बीसीए एनइपी – २०२० च्या पुस्तकांचे प्रकाशन

भुसावळ –
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बीसीए अभ्यासक्रमावर आधारित उत्कृष्ट चार पुस्तकांचे प्रकाशन ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ चे अध्यक्ष डॉ मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ सुनिल व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रकाशन सोहळ्यात Essential of Computers and Programming, Programming Using C++, Office Management Tools, Web Design – I या चार विषयांवरील पुस्तकांचा समावेश होता. उत्कृष्ट अशा शैक्षणिक दर्जाच्या या पुस्तकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दालने उघडून दिली आहेत. एनईपी २०२० च्या उद्दिष्टांना साकारत ही पुस्तके अभ्यासक्रमाशी सुसंगत आणि व्यावहारिक ज्ञान वाढवणारी ठरली आहेत. या सोहळ्यात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ सुनिल व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे सर उपस्थित होते. पुस्तकांचे लेखन प्रा. डॉ. गौरी एम पाटील, प्रा. हर्षल व्ही. पाटील, डॉ. स्वाती पी. फालक यांनी केले आहे. सदर लेखकांना यावेळी सर्वानी विशेष शुभेच्छा दिल्या.