जळगाव –
गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन, दावत-ए-इस्लामी हिंद ची कल्याणकारी शाखा, देशभरातील गरजू आणि असहाय लोकांना ब्लँकेट वाटपाची मोहीम राबवत असून, या मोहिमेअंतर्गत 17 डिसेंबर रोजी भुसावळ शहरात, जामनेर रोड, खडका रोड, मॉडर्न रोड, शिवाजी कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड च्या आसपास गरजू कुटुंबे, लहान मुले, वृद्ध आणि प्रवाशांना थंडीपासून दिलासा देण्यासाठी. कांबळ देण्यात आली, कांबळ मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटणे हे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश आहे. दावत-ए-इस्लामी हिंदचे जळगाव जिल्हाध्यक्ष झुबेर अत्तारी यांनी सर्व देणगीदारांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानले ज्यांच्या योगदानामुळे हे कार्य शक्य झाले. अशा पुण्यकर्मी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण हि देणगी ऑनलाइन देऊ शकता: वेबसाइट: www.gnrf.in/donations/gnrf
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफिक रोशन काद्री, शहराध्यक्ष शोएब अत्तारी, युसूफ खान, अझहर काद्री जहांगीर खान, आसिफ अत्तारी, अमीन अत्तारी, दानिश कुरेशी यांनी प्रयत्न केले.




