भुसावळ..नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधान सभेच्या निवडणुकीत अनेक शिक्षकांना राष्ट्रीय कर्तव्याच्या गोंडस नावाखाली बी एल. ओ.ची शाळाबाह्य कामे सक्तीने लादून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या शासकीय यंत्रणेचा जेष्ठ शिक्षक नेते प्र ह दलाल यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून अन्यायी, व हुकूमशाही प्रवृत्तीला बळी पडलेल्या शिक्षकास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे
या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात प्र. ह.दलाल यांनी म्हटले आहे की,लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे शिक्षक BLO ची ड्युटी आटोपून संध्याकाळी घरी परत जात असताना अपघातात त्याचे दिनांक २० नोव्हेंबर .रोजी सायंकाळी निधन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे शिक्षक अनुवर्दे बुधगाव तालुका चोपडा येथील शाळेत शिक्षक होते.
वास्तविकता शाळेला सुटी असेल,अध्यापनाचे काम नसेल त्याच दिवशी अगदी अनिवार्य असेल तरच शिक्षकांना BLO chi ड्युटी द्यावी असे आदेश संचालक मानव संसाधन मंत्रालय, व शालेय शिक्षण विभाग ,नवी दिल्ली,यांनी दिनांक १३/०९/२०१० अन्वये सर्व सचिवाना दिलेल्या पत्रात म्हटले आहे ,उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनीही याचिका क्र.४१७/२०२० रोजी निर्णयात दिला आहे एव्हढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका क्र. ५६५९/२००७ न्यायनिवाड्यात परिच्छेद ३२ मध्ये म्हटले आहे की शिक्षकांना अनिवार्य असेल तरच व सुटीच्या दिवशी ,अध्यापनाचे काम नसेल तेव्हाच BLO ची ड्युटी द्यावी
असे असतानाही अधिकारी न्यायालयाचाही अपमान करून शिक्षकांना बाराही महिने केव्हाही BLO ची ड्युटी सक्तीने देतात.आणि त्यातूनच आद्य दुर्दैवी घटना घडतात.आता तरी शासन जागृत होऊन शिक्षकांना शाळाबाह्य कामे देवू नये .अन्यथा न्यायालयाचा अवमान म्हणून अशा अधिकाऱ्यांविरुद्ध याचिका दाखल करावी लागेल.राज्य शासनाने त्यांच्या कुटुंबियांना त्वरित पाच लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणीही दलाल यांनी केली आहे.



