भुसावळ – ” गणपती उत्सव- कालचा व आजचा”
या विषयावर रोटरी क्लब ऑफ भुसावळ मधे रो. . हेमंत नाईक यांनी व्याख्यान दिले.
अध्यक्ष स्थानी रो. डॉ. माया आर्वीकर होत्या तर सचिव रो. आरती चौधरी उपस्थित होत्या. या संदर्भात बोलताना हेमंत नाईक म्हणाले भुसावळचा रेल्वेचा गणपती सगळ्यात जुना होता, त्यापासून सुरुवात करून त्यांच्या “लोकमान्य गणेश मंडळाच्या” कार्यक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. त्याकाळी आलेले अनेक उत्कृष्ट नामावंत वक्ते, प्रसिद्ध अभिनेते, गायक, लेखक, त्याचप्रमाणे व. पू. काळे, जयवंत कुलकर्णी, सुधीर गाडगीळ आदी मान्यवररांच्या भेटी , लोकांच्या आठवणीसह तेव्हा घडलेल्या गमती जमती सांगितल्या. त्याचप्रमाणे लहान मुलांचे संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कालागुणांना वाव देण्याचे कार्य त्यावेळी गणेशोत्सवात होत असे पण आजकाल गणेशोत्सवाचा स्वरूप बदललेले आहे. अर्थात त्यासाठी टी. व्ही. मोबाईल, व बदललेला काळ, यामुळे आता असे कार्यक्रम होत नाहीत असे विचार व्यक्त केले .
शेवटी “श्री गणेशा” वर स्वरचित कविता म्हणून आपल्या भाषणाची सांगता केली.
आभार आरती चौधरी यांनी मानले.
या प्रसंगी रो. डाॅ. नारायण आर्वीकर, रो. गोपाल तिवारी, रो. डॉ. दयाघन राणे, रो. राजेश अग्रवाल, रो. महेश भराडे, रो. सारंग चौधरी, रो. मदन बोरकर, सतीश झांबरे व इतर मेंबर हजर होते.



